Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे क्रीडा स्पर्धाचा शुभारंभ

जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल तर्फे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धांचा शुभारंभ २४ऑक्टोबर रोजी करण्यात आला. या स्पर्धा २४ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धांसाठी उपस्थित जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रिडा ध्वजारोहण करून तसेच सहा. आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक, अरुण पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व बियाणी ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांच्या हस्ते क्रिडाज्योत पेटवून स्पर्धांचे उद्धाटन करण्यात आले. आदिवासी थोरपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बॅन्ड पथकाच्या तालावर सहभागी संघांच्या खेळाडूंनी संचालन करून मानवंदना दिली. पळासखेडा आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ऱ्हिदमीक योगासने करून उपस्थितांची मने जिंकली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत असलेल्या १७ शासकीय आश्रमशाळा व ३२ अनुदानित आश्रमशाळांमधील सुमारे १४०० खेळाडू विद्यार्थी/विद्यार्थिनींनी या स्पर्धांत सहभाग घेतला आहे. खो-खो, कबड्डी, अॅथेलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॅंडबॉल यासारखे विविध खेळ प्रकारांसाठी या स्पर्धा होत आहेत.

जन्मतः विविध खेळ गूण अंगी बाळगणाऱ्या अतिदुर्गम भागातील आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचा मोलाचा वाटा आहे. याठिकाणी सांघिक व वैयक्तिक खेळात विजेत्या खेळाडूंनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत देखील जास्तीत जास्त पदके जिंकून यावल प्रकल्पाचे नावलौकिक राखावे” असे उद्गार प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.

जिल्हा क्रिडा अधिकारी नाईक यांनी आदिवासी खेळाडूंना जिल्हा क्रिडा विभागातील तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्यात येईल तसेच यावल प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व शाळांना दर्जेदार क्रिडा साहित्य देण्यात येईल असे आश्वासन दिले. तर भाषणात विजय शिंदे यांनी सहभागी खेळांडूंना प्रोत्साहित करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी क्रिडा धिकारी सचिन निकम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल येथील सहा. प्रकल्प अधिकारी पी.पी.माहुरे, सहा. प्रकल्प अधिकारी पवन पाटील, सहा. प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, सहा. प्रकल्प अधिकारी. लवणे, शिक्षण विस्तार अधिकारी, क्रिडा शिक्षक, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक व शासकीय वासतिगृहांतील गृहपाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी संदीप पाटील, सहा. प्रकल्प अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News