सावली : सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय व सांस्कृतीक विभाग द्वारे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली तर प्रमुख अतिथी डॉ.अशोक खोब्रागडे, डॉ.दिवाकर उराडे, प्रा.प्रशांत वासाडे होते.
प्राचार्य डॉ.ए.चंद्रमौली यांनी राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असून शिक्षकांनी राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे अध्यक्षीय भाषन केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.प्रफुल्ल वैराळे यांनी केले, तर आभार डॉ.रागीनी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजनात डॉ.रामचंद्र वासेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




