Wednesday, May 14, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती सन 2024 ची नवीन कार्यकारणी गठीत

राजेश भुतडा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

देऊळगाव राजा : श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती सन 2024 ची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली, अध्यक्षपदी राजेश भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपस्थित सर्व सदस्यांनी पुष्पहाराने अध्यक्ष व नवीन कार्यकारणी यांचे स्वागत केले.

श्री गणेश मंडळाला प्रोत्साहण देण्याच्या उद्देशाने देऊळगाव राजा शहरांमध्ये श्री गणेशोत्सव प्रोत्साहण समितीची स्थापना 1993 साली झाली. दरवर्षी नवीन कार्यकारणी गठीत करण्यात येते. या वर्षी दिनांक 13 सप्टेंबर रोजी श्री दम्यास्वामी मठ येथे सन 2023 चे प्रोत्साहन समिती अध्यक्ष गणेश सवडे यांच्या अध्यक्षतेमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत श्री गणेशोत्सव प्रोत्साहन समिती सन 2024 या वर्षाची नूतन कार्यकारणी सर्वानुमते गठित करण्यात आली.

या मधे अध्यक्षपदी राजेश भुतडा, कार्याध्यक्ष राजेश इंगळे, उपाध्यक्षपदी प्रभाकर खांडेभराड व कासिफ कोटकर, कोषाध्यक्षपदी सुरज गुप्ता, सचिवपदी सुषमा राऊत व संघटक पदी ॲड घन:श्याम भाला, वसंतअप्पा खुळे, विनोद जयस्वाल, गोविंदराव झोरे, संन्मती जैन व गणेश मंडळ संपर्क प्रमुखपदी संचित धन्नावत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मानद सदस्य म्हणून श्री बालाजी संस्थान देऊळगाव राजा चे वंश पारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद अरुण मोकळ, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, प्रसिद्धी प्रमुख सर्व पत्रकार संघ अशी कार्यकारणी गठीत करण्यात आली. 2023 चे अध्यक्ष गणेश सवडे यांनी आपला पदभार नवीन अध्यक्ष राजेश भुतडा यांना दिला.

या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, शिवाजी वाघ, प्रा.विनायकराव कुळकर्णी, मंगेश तिडके, अश्रफ पटेल, कार्यकारी सदस्य कैलास धन्नावत, गोपाळ व्यास, डॉ.शंकर तलबे, संजय तिडके, प्रकाश खांडेभराड, रमेश नरोडे, पवन बोराटे, ब्रिजमोहन मल्लावत, आदर्श गुप्ता, संतोष राजे, धर्मराज हनुमंते, नंदलाल शर्मा, सुजित गुंडे ॲड रामेश्वर रामाने अनिकेत भाग्यवंत आदी सदस्य बैठकीत उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरज गुप्ता यांनी केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News