Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

क्षेत्रातील होतकरू महीलांच्या रोजगारासाठी कटीबद्ध- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

ब्रम्हपुरी येथील कार्पेट निर्मीती व प्रशिक्षण केंद्राला भेट

ब्रम्हपुरी (चंद्रपुर) : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना महीला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर व लोकर संशोधन संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेले आदर्श लोकसंचालित साधन केंद्राच्या ब्रम्हपूरी येथील कार्यालय व प्रशिक्षण केंद्रास भेट दिली.

यावेळी कार्पेट निर्मीती महीला कामगारांच्या हस्तकलेतुन तयार होणारी कार्पेट यांची उत्तरप्रदेश राज्यातील बनारस शहराच्या बाजारपेठेत प्रचंड मागणी असून ब्रम्हपूरीतील महीला कामगारांनी यशस्वीरित्या बाजारपेठेत आपल्या नावाची ओळख निर्माण केली याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित महिला कामगारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन मजूरीत वाढ करण्याचे निर्देश संबंधित वरिष्ठांना दिले. सोबतच सावली व ब्रम्हपूरी तालुक्यातील होतकरू महिलांना नियमित रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता विशेष प्रयत्न करणार असुन लवकरच सदर दोन्ही तालुका स्तरावर प्रशस्त इमारती उभ्या करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कार्पेट निर्मीती कामगारांच्या मजूरी वाढीचा प्रश्न वेळीच मार्गी लावल्याने उपस्थित महीलांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले.

याप्रसंगी प्रामुख्याने संस्था व्यवस्थापक विद्या लोखंडे, व प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी, महीला कामगार प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News