चंद्रपूर : पत्रकार भवन येथे दि.15.09.2024, रविवार रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची विधानसभा निहाय मतदारसंघाची आढावा बैठक Dr.सिध्दार्थ हत्तिअंबोरे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाची चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची व तसेच जिल्ह्यातील राखीव मतदारसंघाची आढावा बैठक आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केली होती. या बैठकीत Dr.सिध्दार्थ हत्तिअंबोरे अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्याशी वैयक्तिक संवाद साधत जिल्ह्यातील सध्य स्थिती बाबत आढावा घेण्यात आला.
सदरील बैठकीस Dr.सिध्दार्थ हत्तिअंबोरे सह चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष व बैठकीचे प्रमुख पाहुणे रामू तिवारी व चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती चंद्रपुर ग्रामीण जिला अध्यक्ष माननीय प्रफुल खापर्डे, कुणाल रामटेके (महाराष्ट्र महासचिव), तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा, अनुसूचित जाति विभाग आधी पदाधिकारी उपस्थित होतो.