मुंबई : राज्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘विजय संकल्प राज्यस्तरीय पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळावा 2024’ चा भव्य दिव्य कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ हाथीअंबोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाति विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नान पटोले, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोठिया, मुंबई काँग्रेस अध्यक्ष व विद्यमान खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार नितीन राऊत, आमदार राजेश राठोड, राज्य उपाध्यक्ष नाना गावंडे, रवींद्र दळवी, सुनील आहीर, आमदार राजेश राठोड, भाई नगराळे यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने दिमाखदार मेळावा पार पडला.
या वेळी आदरणीय रमेश चेन्नीथला यांनी उपस्थित अनुसूचित जाती विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा व क्रांती दिनी संकल्प करूया व महायुतीला हद्दपार करूया असा संदेश देत आपल्या भाषणात त्यांनी राज्यातून आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर अनुसूचित जाती विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्ष यांनी आपले वैयक्तिक विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास अनुसूचित जाती विभागाचे सर्व प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, जिल्हाध्यक्ष , शहर जिल्हाध्यक्ष, सोशल मीडिया, संविधान रक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनु जाती विभाग कडून आयोजित मुंबई येथे सभेला उपस्थित राहण्यास दिनेश वाघमारे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभाग, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल खापर्डे, चंद्रपूर शहर अध्यक्ष कृणाल रामटेके, चंद्रपूर तालुका अध्यक्ष राजकुमार वर्मा, चिमूर तालुका अध्यक्ष लोकनाथ रामटेके व उपाध्यक्ष जिल्हा कल्याण सोदारी आधी उपस्थित होते.




