वर्धा : आनंद नगर वार्ड नंबर. 28 येथे शिवलिंग मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी इतवारा बाजार परिसरामधूनपरिसरा मधून शीतला माता मंदिर मधून मिरवणूक काढून आनंदनगर येथे समाप्त करण्यात आली. यानंतर महाराज जुगन राम किशोर शुक्ला यांच्या हस्ते पूजापाठ करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वार्डामधील भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विजू नाडे, संतोष शेंगडे, शुभम उईके, प्रफुल बनसोड, गोलू वानखेडे, राज पैठणकर, सुधीर फुलमाळी, महेंद्र गंगेवार, वीरेश मोरे व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.




