Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महिला भगिनी म्हणजे आदिशक्तीच आहेत.

नाशिक : महिला भगिनी म्हणजे आदिशक्तीच आहेत. त्यांच्यासाठी काही करता आले, हे आमचे सर्वांचे भाग्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले, दिलेला शब्द राज्य शासनाने पाळला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन‌ महिलांच्या सुरक्षेप्रति संवेदनशील असून ‘लाडकी बहीण’प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’साठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथे दिली.

महिला सक्षमीकरणासाठी लेक लाडकी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा योजना आणल्या आहेत. लाडक्या बहिणींना दिलेल्या पंधराशे रूपयांचे मोल करता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तपोवन मैदानावर लाडक्या बहिणींच्या उदंड प्रतिसादात झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान महाशिबिरासाठी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत आदींची उपस्थिती होती.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News