कोल्हापूर : जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे. येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर 18 जुलाई 2024 रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद पार पडली.
https://x.com/VijayWadettiwar/status/1813855994105024784?t=7a6jqUGgXDIcwNuJr8d4hw&s=19
विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत, त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केलाच पाहिजे. त्यासोबतच तेथे तोडफोड होत असताना पोलीसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. हिंसाचार करणारे खुले आम व्हीडीओ वरून धमकी देतात पण सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही.