वणी (यवतमाल) : बेलोरा-नायगाव कोळसाखानीत कोयला श्रमिक सभेचे क्षेत्रीय अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या एका बैठकीत बेलोरा- नायगाव कोसाखान कोयला श्रमिक सभेच्या अध्यक्षपदी शरद ठाकरे यांची तर सचिव पदी मनोज चिकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीला कोयला श्रमिक सभेचे क्षेत्रीय महामंत्री विकास सोनटक्के, क्षेत्रीय टीएसपी सदस्य भारत जीवने, जेसीपी सदस्य दबावर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बैठकीला संबोधित करून मार्गदर्शन केले. निवड करण्यात आल्याबद्दल शरद ठाकरे व मनोज चिकाटे यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीला यशस्वी करण्यासाठी गोकुल एंडुलवार, रोशन जोगी, दीपक मिताला, अनिल रेगुंडवार, प्रमोद भोसकर, मारुती बुरकुंडे अक्षय धोबे, विनोद बोबडे मदनकर, गजानन पाचवाई, गिरीश आस्वले, शैलेश टिपले आदींनी सहकार्य केले.