Saturday, May 17, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

17-परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 62.26 टक्के मतदान

मतदान यंत्र स्ट्राँगरुममध्ये सीलबंद

परभणी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, (दि.26) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. परभणी लोकसभा मतदार संघात एकूण 62.26 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यामध्ये 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 62.43 टक्के तर 96-परभणी 62.62 टक्के, 97-गंगाखेड, 63.00 टक्के, 98-पाथरी 64.27 टक्के, 99-परतुर 59.60 टक्के आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.93 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, परभणी लोकसभा मतदार संघात एकुण 62.26 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

मतदान यंत्र स्ट्राँगरुममध्ये सीलबंद

परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये सुरक्षितरित्या आणण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे निरिक्षक कृष्णकुमार निराला, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सर्व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्क्रुटणी प्रक्रिया करून सर्व मतदान यंत्र स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित सीलबंद करण्यात आली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News