Tuesday, May 20, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडव्यात : अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने
गंगाखेड विधानसभा मतदार संघातील नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

परभणी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाअंतर्गत 97-गंगाखेड विधानसभा मतदार संघातील नियुक्त सर्व नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण (दि.14 मार्च) आजरोजी अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आले होते.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तसेच गंगाखेड, पालम आणि पूर्णा तहसिलदार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षणार्थीना आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीतील जबाबदारीच्या कामकाजाबाबत प्रशिक्षण देवून निवडणूकीच्या कामकाजात येणाऱ्या समस्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गंगाखेड उपविभागाअंतर्गत निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संत जनाबाई महाविद्यालय येथील स्टाँगरुम, वाहनतळ आणि सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कामकाजाच्या जागेची पाहणी डॉ.काळे यांनी यावेळी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ.काळे यांनी, लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व प्रमुखांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी काळजीपूर्वक आणि गांभिर्याने पार पाडण्याबाबत सूचना दिल्या. तसेच जे अधिकारी-कर्मचारी नेमुन दिलेली जबाबदारी पार पाडण्यात टाळाटाळ करतील त्यांचे विरुध्द लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे ही अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी यांना उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांनी मार्गदर्शन केले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News