चंद्रपुर : पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांनी अवैध नॉयलॉन मांजा विक्री करनाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्या करीता मोहीम राबवीन्याबाबद आदेशीत करन्यात आले होते. प्राप्त आदेशान्वये विशेष मोहीम राबवीन्याचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पो.उप नि.अतुल कावळे यांचे पथक तयार करुन, दि. 07/01/2024 रोजी पोस्टे राजुरा हद्दित राहनारा एक किराना दुकान मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत नायलन मांजाचे साठवणुक करून विकी करीत आहे. अश्या खबरेवरुन कारवाई करत.
किराना दुकान मालक रा. वार्ड नं ०७ गांधी भवन, राजुरा जि.चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन खालील प्रमाने मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले. यातील मालक विरूध्द आज दि.07/01/2024 रोजी पोस्टे राजुरा येथे अप क्रमांक 09/24 कलम ५, १५ पर्यावरन संरक्षन कायदा १९८६ . सह कलम १८८ भा.द.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोस्टे राजुरा करित आहेत सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल विनायक कावळे, पोहवा अनुप डागे, जमिर पठाण मिलींद चव्हान, नितेश महात्में, सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.




