घुग्घुस (चंद्रपुर) : घुग्घुस येथील माजी सरपंच शोभा ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरपरिषदचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना चंद्रपूर (ग्रामीण) काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी घुग्घुस शहरातील वार्डा – वार्डातील नाली सफाई तसेच फॉकींग मशीन द्वारे फवारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिले. सध्या हिवाळा सुरु झाल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नालीत घाण पाणी साचून आहे त्यातून डासांची उत्पत्ती वाढत आहे व रोगराई शहरात पसरत आहे. लवकरात लवकर करण्यात यावे नाहीतर अन्यथा काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनातून दिला.
यावेळी चंद्रपूर ( ग्रामीण ) काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष विक्रम गोगला, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके, काँग्रेस नेते पवन नागपूरे, अशपाक शेख उपस्थित होते.