घुग्घुस (चंद्रपुर) : शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या मार्गदर्शनात प्रियदर्शिनी कन्या विद्यालय, जि.प.कन्या शाळा, जि.प.मुलांची शाळा, जि.प.हिंदी माध्यम शाळा, जि.प.कॉलरी नंबर २ शाळा, जि.प.उर्दू माध्यमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, एस.सी.सेल जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, काँग्रेस नेते हेमंत उरकुडे यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर, सीनु गुडला, लखन हिकरे, प्रशांत सारोकर, शेखर तंगडपल्ली, शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठया संख्येत उपस्थित होते.