घुग्घुस : गांधी चौकात गुरुवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी भाजपा घुग्घुस तर्फे ईद-ए-मिलाद निमित्त लाडू वाटप करण्यात आले.
ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम समाज बांधवांतर्फे चांदशाह वली दर्गा जवळून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक गांधी चौकात येताच भाजपा घुग्घुस तर्फे मिरवणुकीत सहभागी मुस्लिम समाज बांधवांना लाडू वाटप करण्यात आले. तसेच ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गांधी चौक मार्गे मार्गक्रमण करीत जामा मशीद जवळ मिरवणूकीचे समापन करण्यात आले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मुस्लिम समाजाचे मुन्ना लोहाणी, बाबा कुरेशी, हसन शेख, मोमीन शेख, खलील अहमद, भाजपा नेते चिन्नाजी नलभोगा, संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, अमोल थेरे, विनोद चौधरी, साजन गोहणे, रत्नेश सिंग, शाम आगदारी, सतीश बोन्डे, असगर खान, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, सुनील राम, महेश लठ्ठा, विनोद जंजर्ला, आरिफ शेख व मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.