भाजपा महामंत्री विवेक बोढे यांच्या पुढाकाराने मिळाली हातठेला दुकानदारांना जागा
घुग्घुस : छत्रपती शिवाजी महाराज चौकात तात्पुरते हातठेला लावू द्या अशी मागणी शुक्रवार, ७ जुन रोजी फुटपाथ दुकानदार संघटना घुग्घुसतर्फे न.प. मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा महामंत्री विवेक बोढे यांची फुटपाथ दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व आपली समस्या सांगितली.
त्याअनुषंगाने भाजपा महामंत्री यांनी फुटपाथ दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळासह न.प. मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले.
न.प. मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजपा महामंत्री विवेक बोढे, न.प. कर्मचारी हरी जोगी व फुटपाथ दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन पाहणी केली आणि नपतर्फे काही अटी शर्थीवर हातठेला लावण्यासाठी जागा देण्यात आली.
जागा देण्यात आल्याने न.प. मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार आणि भाजपा महामंत्री विवेक बोढे यांचे फुटपाथ दुकानदार संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात तसेच त्यांचे आभार व्यक्त केले.
जवळपास मागील २० वर्षांपासून याठिकाणी दुकानदार आपले दुकान लावून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु काही दिवसापूर्वी नगर परिषदेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील दुकाने हटविण्यात आले.
त्यामुळे फुटपाथ दुकानदारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गजानन बोम्मावार आदींची उपस्थिती होती.




