Wednesday, April 29, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

गणेशोत्सव दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची घुग्घुस हृद्दित गोवंश तस्काराविरूध्द कारवाई

चंद्रपुर : जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैदयरीत्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने दि. २१ /० ९ /२०२३ रोजी रात्रौ अं. २२:०० वा. दरम्यान घुग्घूस हद्दित एमआयडीसी–शेणगाव रोडवर सापळा रचून असता एक TATA XENON गाडी क. MH04 -GC-7497 हि पिकअप गाडी काहि गोवंश निर्दयपणे कोंबून वाहतूक करीत असतांना दिसून आल्याने सदर वाहनास विशेष पथकाने थांबवले असता ड्रायव्हर सदर वाहन वेगाने पळवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर चे विशेष पथकाने सदर पीकअप गाडीचा पाठलाग केला असता एका निर्जन स्थळी गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. उभ्या TATA XENON गाडी क. MH04 GC 7497 ची पाहणी केली असता सदर वाहनात ०९ जिवंत गोवंश निर्दयपणे कोंबून असल्याचे दिसले. सदर ०९ जिवंत गोवंशची सुटका करून व वैदयकिय तपासणी करून प्यार फॉउंडेशन गौरक्षण संस्था, दाताळा येथे सुखरूप पोहचविण्यात आले.

फरार चालक – मालका विरूध्द पो.स्टे. घुग्घूस येथे अप.क. ३ ९ ३ / २०२३ कलम ११ ( १ ), ( ड ) प्रा.नि.वि. कायदा १ ९ ६०, सहकलम ५ अ ( १ ), ५ ब, ९ , ११ महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३, १३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शना खाली महेश कोंडावार, पोनी स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनी नागेशकुमार चतरकर, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, ना.पो.अ. अजय बागेसर, चंदू नागरे, पो.अ. प्रशांत नागोसे, चानापोअ दिनेश अराडे यांनी यशस्वीपणे केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News