Thursday, September 10, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

वर्धा शहर DB पथकाची धडक कारवाई; चार चोरीच्या दुचाकी जप्त

वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस; २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Wardha City DB Squad Takes Decisive Action; Four Stolen Two-Wheelers Recovered

वर्धा : वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाने धडक कारवाई करत एका संशयित आरोपीकडून चोरीच्या तब्बल चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या वाहनांची एकूण अंदाजे किंमत २ लाख १५ हजार रुपये असून, आरोपीने वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातून वाहन चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे.

दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी नालंदा नगर महिला आश्रम, वर्धा येथून Honda Activa क्रमांक MH-32-BF-1546, अंदाजे किंमत ६० हजार रुपये, चोरीस गेली होती. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 1303/2026, कलम 303(2) BNS अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

दरम्यान, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अनुराग (वय २१, रा. तलोडी, ता. सेलू, जि. वर्धा) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने वर्धा शहरातील चोरीच्या Activa सोबतच इतर ठिकाणी चोरी केलेल्या वाहनांबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एकूण चार चोरीची वाहने जप्त केली. त्यामध्ये—

  • Honda Activa MH-32-BF-1546 — वर्धा शहर पोलीस ठाणे, अंदाजे किंमत ₹60,000
  • Honda Shine MH-40-BM-1977 — हिंगणा पोलीस ठाणे, जि. नागपूर, अंदाजे किंमत ₹50,000
  • Royal Enfield MH-34-AX-1120 — राजुरा पोलीस ठाणे, जि. चंद्रपूर, अंदाजे किंमत ₹1,50,000
  • Hero Honda Splendor Plus MH-32-S-8869 — वर्धा शहर पोलीस ठाणे, अंदाजे किंमत ₹15,000

अशा चार वाहनांचा समावेश आहे.

या कारवाईमुळे वर्धा शहर, हिंगणा (नागपूर) आणि राजुरा (चंद्रपूर) येथील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, चोरीच्या वाहनांची विल्हेवाट कशी लावली जात होती तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आरोपीला दि. १० सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडिक आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, हेड कॉन्स्टेबल अभिजित वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल रंजित भुरसे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवण यांनी ही कारवाई केली.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News