चंद्रपूर : घुग्घुस पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत तडीपार आरोपी याला पकडले आहे. हा आरोपी चंद्रपूर येथील तडीपार असूनही घुग्घुस हद्दीत राहून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता.
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री घुग्घुस पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध पो.स्टे. अप. क्र. १९६/२५ कलम १४२ म.पो.का. सह कलम ४, २५ भा.ह.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रकाश राऊत, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन घुग्घुस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे, पोउपनि गणेश अनभुळे व गुन्हे शोध पथकातील पोहवा अनिल बैटा, पोशि महेश भोयर, पोशि सुहास विधाते व पोशि विजय चंपक यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहे.





