Thursday, July 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त सफेद झंडा कामगार संघटनेचे अभिवादन कार्यक्रम संपन्न

घुग्घुस (चंद्रपूर): स्वतःच्या त्यागातून समाजासाठी मायेची साऊली बनलेल्या माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सफेद झंडा कामगार संघटना, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांनी बुद्धवंदना घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकत, “माता रमाईंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खंबीर पाठबळ दिले म्हणूनच त्यांना समाजोन्नतीसाठी अतुलनीय कार्य करता आले. त्यांचे जीवन आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला शरद पाईकराव, जगदीश मारबते, दत्ता वाघमारे, राकेश पराशिवे, बबन वाघमारे, विजय कवाडे, अशोक भगत तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. या अभिवादन कार्यक्रमामुळे माता रमाईंच्या कार्याचा गौरव करत समाजात त्यांची शिकवण दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News