चंद्रपुर : घुग्घूस शहरातील काँग्रेस कार्यालयात 76 व्या गणतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने आणि वीर शहिदांच्या स्मरणाने हा सोहळा अधिक महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची शोभा वाढवत लाडूंचे वाटपही करण्यात आले. या उत्सवाने लोकशाहीच्या सन्मानाची जाणीव पुन्हा अधोरेखित केली.




