नागपूर : महानगरपालिका (NMC) च्या उद्यान विभागाच्या वतीने आयोजित पुष्पोत्सव २०२५ प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
हा पुष्पोत्सव त्रिमूर्ती नगर येथील राजीव गांधी ‘ग्लो गार्डन’ येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या फुलांचे आकर्षक सजावट, दुर्मीळ वनस्पती, आणि निसर्गाच्या विविधरंगी छटा पाहायला मिळत आहेत. नागपूरकरांसाठी हा उत्सव एक विशेष आकर्षण असून, पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी तो उपयुक्त ठरेल.
उद्घाटनावेळी मनपा आयुक्तांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षण आणि फुलांच्या महत्त्वाबद्दल संदेश दिला. या उपक्रमामुळे नागपूर शहरातील सौंदर्य वृद्धिंगत होईल आणि पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




