नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयात आज भारताचा ७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपिन, IAS, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी डॉ. इटनकर आणि उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली. पोलिस विभागाच्या बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले.
कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




