Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

जिल्ह्यात एकूण 93 अर्जाची उचल

गडचिरोली : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. 67-आरमोरी (अ.ज.) व 68-गडचिरोली (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.
नामनिर्देशन सादर करण्याच्या पहिल्या दिवशी अहेरी येथून (अपक्ष) अर्ज सादर केला आहे. त्यामुळे अहेरी विधानसभा मतदार संघात आजपर्यंत एकूण दोन अर्ज दाखल झाले आहेत. तर गडचिरोली व आरमोरी विधानसभा मतदार संघात दोन्ही दिवशी कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नाही.

23 ऑक्टोबर 2024 रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 3 व्यक्तींनी 10 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 6 व्यक्तींनी 16 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात काल एकूण 57 व 23 ऑक्टोबर 2024 रोजी 36 असे दोन दिवसात एकूण 93 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News