एससी, एसटी, ओ.बी.सी. समाज बांधवांनी उपस्थित राहा, सविता मुंढे यांचे आवाहन
देऊळगाव राजा : वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली एससी, एसटी, ओ.बी.सी. आरक्षण बचाव यात्रा ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता देऊळगाव राजा शहरात येत आहे. गोकुळ हॉटेल जवळ आरक्षण यात्रेचे स्वागत करण्यात येईल, तरी या प्रसंगी शहर व परिसरातील एससी, एसटी, ओ.बी.सी. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षा सविता मुंढे यांनी देऊळगाव राजा येथे कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोणाचाही आक्षेप नाही मात्र ओ.बी.सी मधून आरक्षण देण्यास प्रचंड विरोध आहे. ओ.बी.सी आरक्षण टिकून राहावे यासाठी बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव असे नेते आग्रही आहेत असे सविता मुंढे यांनी सांगितले. देऊळगाव राजा येथून आरक्षण बचाव यात्रा मुख्य मार्गाने सिंदखेड राजा कडे रवाना होणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष उद्धव वाकोडे, जेष्ठ नेते मनोज इंगळे उपस्थित होते.




