Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाचे शानदार उद्घाटन

देवळी (वर्धा) : ‘अभ्यासपूरक उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होत असते. या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पाडणारा आहे, असे प्रतिपादन स्थानिक असे एस.एस.एन.जे.कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे यांनी मार्गदर्शन करताना केले.

यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सुनिता सोनारे तर प्रमुख अतिथी म्हणून 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे हवालदार मेजर भीमराव जाधव राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीश यावले व एनसीसी अधिकारी तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर मंचावर उपस्थित होते.

सदर उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, पर्यावरण पूरक उपक्रम, क्रीडांगण व क्रीडा सुविधा, परसबाग, स्काऊट गाईड राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तथा राष्ट्रीय हरित सेना व विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन व अध्ययन यावर भर दिला जाणार आहे.

या उपक्रमाचे समन्वयक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाबाबत विस्तृत माहिती देऊन 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन कॅडेट सुप्रिया यादव व पायल चौके यांनी तर आभार सार्जंट आदर्श नाईक यांनी मानले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News