Friday, July 31, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुसमध्ये भव्य महाआरोग्य शिबिर; ५,२८१ नागरिकांची तपासणी, ५७४ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र

प्रणयकुमार बंडी

घुग्घुस, चंद्रपूर : “आरोग्य हीच खरी संपत्ती” या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवत लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. मागील २० वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या जनहिताच्या उपक्रमाला यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्थानिक प्रयास सभागृहात आयोजित शिबिरात तब्बल ५,२८१ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ५७४ रुग्णांची विविध शस्त्रक्रिया व पुढील मोफत उपचारांसाठी निवड करण्यात आली.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढत्या आजारांचे प्रमाण आणि महागड्या उपचारांचा आर्थिक बोजा लक्षात घेऊन आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात हृदयविकार, नेत्ररोग, कान-नाक-घसा, दंतरोग, किडनीचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार करण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर आणि विनोबा भावे रुग्णालय येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मोलाचे योगदान दिले.

शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामटेके, उपसिव्हिल सर्जन डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. अभिषेक दीक्षित, डॉ. अश्विन रडके, कॅम्प समन्वयक डॉ. अजय ठाकरे, डॉ. हर्षल मेंढे, डॉ. हेमंत जुनेजा, डॉ. राजेश कांबळे, नगरसेविका वैशाली ढवस, नगरसेविका चैताली सातपुते, तसेच घुग्घुसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पडगिलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थित राहून शिबिराची पाहणी केली. त्यांनी आरोग्य सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले. तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना “सेवेचे दुसरे रूप” असे संबोधत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी शुभेच्छा व्यक्त केली.

या महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमोल थेरे, सुरेंद्र भोंगळे, रोहित जयस्वाल, रत्नेश सिंग, बंटी बेगल, रमेश कट्टेकोला, मानस सिंग, पियूष भोंगळे, सुनंदा लिहिटकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News