Tuesday, May 26, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

घुग्घुसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामे ठप्प — नागरिकांची मोठी गैरसोय

(प्रणयकुमार बंडी)

घुग्घुस (जि. चंद्रपूर) — नगर परिषद निवडणूक 2025 च्या वातावरणात शहरातील विविध विकासकामांना कासवगती आली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 03 मधील पाइपलाइन दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन कनेक्शनचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्यामुळे अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी प्रचंड तगमग सहन करावी लागत आहे.

फक्त पाणीपुरवठाच नव्हे, तर सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांची परिस्थितीही अत्यंत खराब झाली असून नागरिकांना दररोजच्या ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते उखडलेले असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत, तर विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वर्ग या समस्येमुळे त्रस्त आहेत.

दरम्यान, घुग्घुस नगर परिषद निवडणूक समीप आल्यामुळे अनेक अधिकारी निवडणूक कामकाजात व्यस्त आहेत. परिणामी, सुरू असलेली विकासकामे नियोजित वेगाने पूर्ण होत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. “कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, पाणी मिळत नाही, रस्त्यांची अवस्था बिकट — या सर्व समस्यांकडे नेते आणि संबंधित अधिकारी नेमके कधी लक्ष देणार?” असा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेला येत आहे.

निवडणूक रणधुमाळीत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News