घुग्घुस, चंद्रपूर : आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र आणि आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी दुपारी घुग्घुस येथून विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची ७५ वी तुकडी रवाना करण्यात आली. या उपक्रमाचे मार्गदर्शन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी केले.
सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र तर्फे करण्यात येणार आहे. नुकत्याच आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस शहरात भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात रुग्णांची नि:शुल्क तपासणी करण्यात आली होती. तपासणीत पात्र ठरलेल्या रुग्णांना विविध आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी (मेघे) येथे पाठविण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, भाजपा नेते प्रमोद भोस्कर, आकाश निभ्रड, बबलू सातपुते, असगर खान, तुलसीदास ढवस, धनराज पारखी, महेंद्र मेश्राम, हेमंत कुमार, सुरेंद्र जोगी, दीपक अनेजा, योगेश भोंगळे, अशोक भोंगळे, अमोल रेगुंडवार, उमेश दडमल, संदीप तेलंग, हनुमान खडसे, सुनंदा लिहीतकर आदी मान्यवर उपस्थित होते.




