घुग्घुस (चंद्रपुर) – नगर परिषद घुग्घुस अंतर्गत जुन्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पाणीपुरवठा टाकीची साफसफाईची कामे सध्या सुरू असून त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे.
नगर परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्वच्छता प्रक्रिया अत्यावश्यक असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा थांबविण्यात आला असून दिनांक 23 मे 2025 पासून पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात येईल.
मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे व पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेतर्फे होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.