Thursday, May 14, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

“तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर” विषयावर IIM नागपूरमध्ये राष्ट्रीय परिषद; केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी प्रमुख अतिथी

नागपूर – लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज रविवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूर येथे “तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन देवी अहिल्याबाई स्मारक समिती-नागपूर, मिथिक सोसायटी-बेंगळुरू, IIM नागपूर, डब्ल्यू.ई.एस. श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर-नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ-नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या परिषदेत केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी असतील. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांच्या उपस्थितीत एक विशेष ‘स्पॉटलाइट सत्र’ आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय सरकार्यवाहिका चित्रा जोशी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि IIM नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

देवी अहिल्याबाईंच्या विचारांचा जागर आणि त्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजाला प्रेरित करण्याचा या परिषदेमागील उद्देश आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News