मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नाव नोंदणीसाठीची अंतिम मुदत वाढवली आहे. आता इच्छुक विद्यार्थ्यांना २६ मे २०२५ पर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे.
ही प्रक्रिया मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि महाराष्ट्र शासनाच्या २० एप्रिल २०२३ रोजीच्या निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रम, तसेच ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड एक्झिट या अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.




