Water Bowls for Birds: Free Distribution of 1,000 Clay Pots in Solapur
सोलापूर – सोलापूर शहरात शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून चार हुतात्मा पुतळा चौक येथे पक्ष्यांसाठी मोलाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरवासीयांना एक हजार मातीची जलपात्रे मोफत वाटप करण्यात येणार आहेत.
सोलापूरातील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट हायस्कूलच्या १९८८ सालच्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरू केला असून, गरमीच्या दिवसांत तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणपोई उपलब्ध करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
या उपक्रमासाठी अहमदाबादमधील अंकुर इंडस्ट्रीजने पुढाकार घेतला आहे. पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र व्होरा यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, “पक्ष्यांच्या जीवनासाठी पाणी उपलब्ध करून देणे ही आपल्या जबाबदारी आहे. ही छोटीशी मदत त्यांच्यासाठी जीवनदायी ठरू शकते.”
शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




