Friday, June 12, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

महाकाली यात्रेनिमित्त चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात ३ एप्रिलपासून सुरू झालेल्या माता महाकाली यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून, यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल केले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१)(ब) नुसार ही अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केली आहे. ही वाहतूक व्यवस्था ३ ते १३ एप्रिल या कालावधीत लागू राहणार आहे.

बंद रस्ते व नो पार्किंग झोन:

अंचलेश्वर गेट ते बागला चौक मार्ग सायकल वगळता सर्व वाहनांसाठी बंद.
अंचलेश्वर गेट ते कोहीनूर तलाव, महाकाली मंदिर पार्किंग ते आर. के. चौक हे मार्ग ‘नो पार्किंग’ आणि ‘नो हॉकर झोन’ म्हणून घोषित.
महाकाली मंदिर ते गौतम नगर मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहणार.

पर्यायी मार्ग:

बागला नगर, महाकाली वॉर्ड, भिवापूर वॉर्ड येथील नागरिकांनी भिवापूर – हनुमान खिडकी – दादमहल वॉर्ड या मार्गाचा वापर करावा. हा मार्ग केवळ मोटरसायकल व ऑटो रिक्षासाठी खुला असेल.
चारचाकी वाहनांसाठी – लालपेठ कॉलरी – पठाणपुरा गेट – गांधी चौक मार्गाचा वापर करावा.
शहराबाहेर जाण्यासाठी – कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा.

पार्किंग व्यवस्था (यात्रेकरूंसाठी):

  1. कोहीनूर तलाव मैदान – केवळ जिप व कारसाठी (जड वाहनांना प्रवेश नाही).
  2. इंजिनिअरिंग कॉलेज ते भिवापूर मार्केट रस्ता – तेलंगणा व आंध्रप्रदेशातून येणाऱ्या बसेससाठी.
  3. डी.एङ कॉलेज मैदान (जुनी बाबूपेठ पोलिस चौकीजवळ) – सर्व प्रकारच्या वाहनांसाठी.
  4. न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान (विश्रामगृहासमोर) – राज्य परिवहनच्या बसेससाठी.
  5. बैलबाजार पार्किंग क्र.१ आणि क्र.२ – सर्व प्रकारच्या वाहनांसाठी.
  6. नयरा पेट्रोल पंप परिसर (बायपास रोड, आंबेडकर चौक) – सर्व प्रकारच्या वाहनांसाठी.

पोलिस प्रशासनाकडून नागरिक व यात्रेकरूंना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी वाहतूक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे व सहकार्य करावे, जेणेकरून महाकाली यात्रा सुरळीत पार पडू शकेल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News