Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

पिपरी रेती घाट प्रकरण गाजतेय: पत्रकाराला धमकीप्रकरणी प्रशासनावर प्रश्नचिन्ह, संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची मागणी

चंद्रपूर – जिल्ह्यातील रेती व्यवसायावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कोणत्याही रेती घाटांचा लिलाव झाला नसतानाही, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध रेती चोरीचा धंदा पणे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) विकासकामांसाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काही रेती घाट खासगी कंत्राटदारांना देण्यात आले. मात्र, या कंत्राटदारांनी काही राजकीय वरदस्त असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन रेतीची खुलेआम विक्री सुरू केल्याची जोरदार चर्चा आहे.

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनेलचे संपादक अनुप यादव यांनी “पिपरी रेती घाट पर शिवा, राशीद, अमोल, शाम, पारस का रेत सम्राज्य! प्रशासन मौन कयों?” या शीर्षकाखाली एक वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे संतप्त झालेल्या अमोल नामक राजकीय व्यक्तीने संपादक अनुप यादव यांना मोबाईलवरून धमकी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अमोलसारखे राजकीय व्यक्ती जर “तो रेती घाट माझा आहे” असे म्हणत पत्रकारांना धमक्या देत असतील, तर प्रशासन काय भूमिका घेत आहे, असा सवाल उपस्थित होतो आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून, संबंधित रेती कंत्राटदारांविरुद्ध कठोर कारवाई करावी व त्यांच्या एजन्सीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी होणार असल्याचे समजते.

या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News