नाशिक: राष्ट्रीय बालस्वास्थ्य उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य तपासणी अभियानाचे उदघाटन आज (दि. १) नाशिक महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४९ येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.
या वेळी बोलताना भुसे म्हणाले की, “राष्ट्रीय बालस्वास्थ्य उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करताना प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड) तयार करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.”
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाईल, तसेच त्यांना आवश्यक असलेले वैद्यकीय सहाय्यही दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल आणि गरज असल्यास तातडीने उपचार मिळू शकतील.
कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




