गोंदिया : जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) उभारलेला पर्यटक निवास पर्यटकांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेल्या या निवासामुळे पर्यटकांना वन्यजीव पर्यटनाचा उत्तम अनुभव मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निवासाचे लोकार्पण आभासी पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, तसेच पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
या नव्या सुविधेमुळे विदर्भातील पर्यटनाला चालना मिळेल आणि नवेगाव नागझिरा प्रकल्पाकडे अधिक पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




