Saturday, May 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, तसेच विद्यावेतन वाढवून ते नियमित व वेळेवर मिळावे

गडचिरोली : जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या रोजगार व अधिकारांसंदर्भातील मागण्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतरही या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, तसेच विद्यावेतन वाढवून ते नियमित व वेळेवर मिळावे, अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.

ऑगस्ट २०२४ पासून २७ आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या २,३०० प्रशिक्षणार्थींचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण फेब्रुवारीत संपणार आहे. त्यामुळे जुन्या आस्थापनांमध्येच त्यांना कायम करण्याची प्रमुख मागणी मोर्चात करण्यात आली. या आंदोलनात २,००० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ कोवे, उपाध्यक्ष चरण बन्सोड, आणि सचिव पंकज नैताम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी आपली समस्या आणि मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एकजुटीने हा लढा दिला.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News