Tuesday, October 27, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

हिंगोलीत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती रॅलीचे आयोजन

हिंगोली: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आरोग्य विभाग राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, जिल्हा हिंगोली यांच्या वतीने “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान” राबविण्यात आले. या अभियानाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली शहरातील गांधी चौकातून काढण्यात आली.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “कुष्ठरोग हा पूर्णतः बरा होणारा आजार आहे”, “लवकर निदान आणि योग्य उपचार हाच बचावाचा उपाय” अशा घोषणांच्या माध्यमातून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हातात माहितीपर फलक घेत, विविध घोषणांनी शहरभर जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात आरोग्य विभागाचे अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि मोफत उपचार याबद्दल माहिती देण्यात आली.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “कुष्ठरोगाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत, पण हा आजार उपचाराने पूर्ण बरा होतो. वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास कुष्ठरोगीही निरोगी जीवन जगू शकतो.”

या अभियानामुळे जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News