गडचिरोली : येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लॉईड मेटल कंपनीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पांत राज विद्यानिकेतन सीबीएससी शाळा, मेमोरियल हॉस्पिटल, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पोलीस ऑफिसर फॅमिली कॉर्टर्स, जिमखाना, आणि बालोद्यान यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी तसेच नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षकही उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे गडचिरोलीच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.




