Monday, June 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात महावितरणची धडक कारवाई, ९,००० हून अधिक जोडण्या खंडित

नागपूर : नागपूर परिमंडळातील थकीत वीजबिल भरणा न करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कठोर पावले उचलत धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जानेवारी महिन्यात तब्बल ९,००० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.

महावितरणच्या आकडेवारीनुसार, नागपूर परिमंडळात अनेक ग्राहकांनी दीर्घकाळ वीजबिल थकवले असून, वारंवार नोटीस देऊनही वीजबिलाचा भरणा न केल्याने ही कारवाई करण्यात आली. यासोबतच, थकबाकी वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना थेट भेट देण्यास सुरुवात केली आहे.

मुख्य अभियंता दोडके यांनी ग्राहकांना विनंती केली आहे की, वीजबिल वेळेवर भरावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तसेच, थकबाकीदार ग्राहकांनी त्वरित थकीत रक्कम भरून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणच्या या धडक कारवाईमुळे नागपूरमधील हजारो ग्राहकांवर परिणाम झाला असून, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News