Friday, May 1, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

चंद्रपूरचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावे

चंद्रपुर : माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्यासाठी विशेष विनंती किशोर जोर्गेवार यांनी केली आहे.

या महोत्सवाचे आयोजन १० जानेवारीपासून चंद्रपूर येथे करण्यात आले असून, कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम, चर्चासत्रे, वादविवाद आणि स्मरणिकेचे प्रकाशन यांचा समावेश आहे. कन्नमवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा आणि जनहितकारी कार्याचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले असून, त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला अधिक महत्त्व प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. स्मरणिकेचे प्रकाशन ही या सोहळ्याची महत्त्वाची घटना असेल, ज्यातून कन्नमवार यांच्या कार्याचा मागोवा घेता येईल.

हा महोत्सव केवळ कन्नमवार यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न नाही तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक विकासासाठी नवा मार्ग दाखवण्याचा एक प्रयत्न असेल.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News