Thursday, April 30, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

100 मिनीटांच्या आत तक्रारींची सोडवणूक

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 29 तक्रारी प्राप्त

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी – व्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत कार्यवाही केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत एकूण 29 तक्रारी सी-व्हिजील ॲपवर प्राप्त झाल्या. त्यापैकी 16 तक्रारींमध्ये तथ्य नसल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्या रद्द केल्या तर उर्वरीत दाखल 13 तक्रारींची सोडवणूक करण्यात आली आहे.

सी-व्हिजीलवर प्राप्त तक्रारी :
चंद्रपूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 16 तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले नाही. यात ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 1 तक्रार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील 2 आणि चिमूर मतदारसंघातील 13 तक्रारींचा समावेश आहे. तर तथ्य असलेल्या व सोडवणूक केलेल्या 13 तक्रारींमध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील 2 तक्रारी, चिमूर येथील 6 आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातील 5 तक्रारींचा समावेश आहे.

काय आहे सी- व्हिजील ॲप :
सी – व्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आय.ओ.एस. डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशील, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य :
सी- व्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा :
एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख :
या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ :
या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई :
या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा :
या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड ठेवला जातो.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News