Friday, January 16, 2026

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

शिक्षक आमदार यांनी देऊळगावराजा हायस्कूल, देऊळगावराजा येथे दिली सदिच्छा भेट

देऊळगाव राजा : देऊळगावराजा हायस्कूल, देऊळगावराजा च्या वतीने शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार महोदयांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करीत शाळेनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे, एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत असताना आपल्या शाळेने केलेले कार्य अतुलनीय आहे असे म्हणून शाळा प्रशासनाचे अभिनंदन केले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या व काही समस्या असल्यास विमाशी संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन आमदार मान. अडबाले यांनी केले.

यावेळी माजी आमदार व्ही.यू.डायगव्हाणे, प्रांतिक उपाध्यक्ष जयप्रकाश थोटे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालांकर, शाळेचे सचिव श्री. मिश्रीकोटकर, कोषाध्यक्ष धन्नावत, मुख्याध्यापक कोल्हे, पर्यवेक्षक डी.जाधव, विजुक्टा चे गाडेकर, विमाशि संघाचे गुरव सर व शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News