अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातर्फे उपमुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य मोफत तपासणी अंतर्गत वलगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. आरोग्य शिबिरात कर्करोग, हृदयरोग, मेंदू, लघवी, किडनी, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, बालरोग रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील 102 रुग्णांपैकी 34 रुग्णांवर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे, विशेष कार्य अधिकारी डॉ.मंगेश मेंढे, नोडल अधिकारी डॉ.श्याम गावंडे यांनी पुढाकार घेतला. शिबिरामध्ये तपासणीसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूमध्ये डॉ.सपना गुप्ता, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, समुपदेशक दिनेश हिवराळे, लेखापाल भूपेंद्र जेवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र वलगाव डॉ. दक्षायणी अनवाने, पी. एस. शहा, एच.एल.एल.मिलिंद गजभिये, गिरिश उघडे, रूग्णवाहिका चालक दिपक शर्मा, परिचर हर्षा काळे यांनी सहकार्य केले.