Saturday, December 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

मरेगाव येथे मोफत डोळे तपासणी व ४५० रुग्णांना चष्म्यांचे वाटप

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

चंद्रपुर : जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रिदाप्रमाणे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक उपक्रमातून विविध जनसेवा कार्य अभियाने राबविली. याच उदांत हेतूने सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथे आयोजित शिबीरा अंतर्गत नुकतेच मोफत डोळे तपासणी करून गरजू ४५० रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्र विकासासह क्षेत्रातील जनतेच्या आरोग्याची ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काळजी घेत आजवर विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून यातून नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया व अन्य आजारांवर मात करण्यासाठी सहकार्य केले. यात कर्करोग, नेत्ररोग, हृदयाला छिद्र, स्वादुपिंड विकार, जठराचे रोग, हृदयरोग तसेच इतर गंभीर आजारांचा समावेश आहे. केवळ राजकारणात पुरताच लोकप्रतिनिधी नसून राजकारणा पलीकडेही समाजकारण आणि समाजसेवा याची जाण ठेवणारा सच्चा जनसेवक म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे.
सध्या विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण वृध्द रुग्णांना दिलासा देणे हेतू विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव येथे नुकतेच मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. आयोजित शिबिराचा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. यातून ४५० गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी प.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, सरपंच संदीप ठाकरे, माजी सरपंच गडमौशी सचिन नाडमवार, ग्रामसेविका जुमनाके, घोट सरपंच सुनंदा गावडे, पी.एम. सलामे जनसंपर्क कार्यालय प्रमुख अशोक सहारे विजय सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News