Tuesday, May 13, 2025

Breathe of Life Multipurpose Society UCO BANK- A/C- 09110110049020, IFSC : UCBA0000911, MICR CODE : 442028501

spot_img
spot_img

धनगड व धनगर हे एकच

धनगर आरक्षणासाठी शेणगाव येथे रास्तारोको

सकल धनगर समाज यांच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन

जिवती (चंद्रपुर) : धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी उपोषण केले आणि मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगड व धनगर हे एकच असल्याचे म्हटले आहे.

मुळात राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही जे आहे ते धनगर असल्याचे शपथपत्र सुद्धा शानसांने तीन वेळा मुबंई उच्च न्यायालयाला सादर केलेले आहे. धनगर च्या ऐवजी चुकीने धनगड झाले असल्याने व आता च्या अभ्यास गटाने सुद्धा महाराष्ट्रात धनगड हे धनगर असल्याचे स्पष्ट केले असल्याने आता धनगर जातीला त्वरित अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत या संदर्भात तालुक्यातील मुख्य ठिकाण शेणगाव येथे धनगर समाजातील लोकांनी रास्तारोको आंदोलन केले.

यावेळी जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्फत तहसीलदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी उपस्थित धनगर समाजाचे वरिष्ठ नेते मंगेश गुलवाडे, महेश देवकते, माधव डोईफोडे, शिवाजी श्रीरामे, गोविंद गोरे, रामचंद्र हाके, रामराव शेळके, रमाकांत माने, शंकरराव सोलनकर, खंडेराव सलगर, नामदेव सलगर, दत्ता माने, संग्राम बाजगीर, शिवाजी माने, किशोर चांदुरे, गोविंद केजगीर, व्यकटी थाडगे, बापूराव गोरे, बालाजी करले, रामचंद्र खटके, विनोद पोले, बालाजी चिटगिरे, मोहन मस्के, प्रकाश पोले, तिरुपती कुंडगीर, तुलसीदास सलगर, सुमनबाई शेळके, अशोक पोले, अण्णासाहेब माने, अरुण थोरात रामकिसन देवकते, डिंगाबरं ढाले, गनपत सलगर, दीपक हाके, रांमचंद्र सलगर, नितेश करे, गनपत सुरणनर, तिरुपती सलगर, गोपीनाथ बोरुळे आदी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होता.

spot_img

Pranaykumar Bandi

WhatsApp No - 9112388440
WhatsApp No - 9096362611
Email id: vartamanvarta1@gmail.com

RELATED ARTICLES
Today News

Breaking News

Crime News