गडचांदूर (चंद्रपुर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर येथे अभिनव उपक्रम राबविल्या जात आहे . एन एस क्यू एफ पोर्टल वरील तब्बल दोन अभ्यासक्रम शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
विषय मॉडेल करिक्युलम गार्डनर.
विद्यार्थी शालेय ज्ञानामध्येच परिपूर्ण न राहता त्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेमध्येच परसबाग फुल झाड औषधी वनस्पती ऑक्सिजन हब उपलब्ध असल्यामुळे गार्डनर हा विषय घेण्यात आला. आणि त्याद्वारे शाळेत उपलब्ध साहित्याद्वारे वस्तूद्वारे मुलांना गार्डनरचा अध्ययन अनुभव दिल्या जात आहे.
साधारणतः जुलैपासून हा अभ्यासक्रम शाळेमध्ये सुरू केला* आणि विद्यार्थी या अभ्यासक्रमामध्ये आवडीने काम करू लागले.
परसबागेची देखभाल करणे, दुरुस्ती करणे, नवीन वनस्पती कुठूनही आणून लावणे. त्याचे संवर्धन करणे, क्रॅसिंग वनस्पती तयार करणे जसे की वेगवेगळ्या रंगाचे फुल झाडाचे काड्या एकत्र करून त्याच्यापासून नवीन कलम तयार करणे, ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती जास्तीत जास्त आणणे औषधी वनस्पती जास्तीत जास्त मिळवणे ऑक्सिजन हबच्या ठिकाणी लावणे. त्याचा संवर्धन करणे अशा गोष्टी करू लागला त्याबद्दलची माहिती सांगू लागला…
शाळेच्या अथक प्रयत्नातून वरील दोन विषय शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त एन एस क्यू एफ पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. हा अभिनव उपक्रम शाळा घेत असल्यामुळे सर्व गावातील विविध समित्यांनी पालकांनी शाळेचा भरभरून कौतुक केलं त्यांच्या मुलांमध्ये दिसून आलेलं परिवर्तन ही त्यांना दिसून आला त्यामुळे पालकही गावातील औषधी वनस्पती शाळेमध्ये घेऊन लावतात शेतकरी येऊन शेती विषयी माहिती देऊन जातो असा परिवर्तन NSQF पोर्टलच्या माध्यमातून लखमापूर शाळेच्या मध्ये दिसत आहे.
या सर्व गोष्टी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोरेश्वर जोगी आणि टीम आणि शाळेतील इतर विविध टीम शाळेत येऊन माहिती घेत असते, आम्हाला दिसत असलेले उपक्रमांनी वेगळ्या रूपात मांडण्याचा प्रयत्न करत असतो.




