घुग्घुस (चंद्रपुर) : बदलापूर व कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर व विद्यार्थीनी वर झालेल्या अत्याचारातिल आरोपींना तत्काळ फाशिची शिक्षा देण्यात यावी संत साईबाबा बहुद्देशीय संस्था घुग्घुस, यांची व समस्त गावकऱ्यांची मागणी.
आज दिनांक 21 ऑगस्ट 2024, बुधवार रोजी ठाणेदार, पोलीस स्टेशन यांना संत साईबाबा बहुद्देशीय संस्था घुग्घुस व समस्त गावकरी नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन विनंती करण्यात आली की मागील अनेक दिवसापासून देशात व राज्यांमध्ये महिलांवर विविध अत्याचार, बलात्कारा सारख्या घटना होत आहे. त्यात कलकत्ता येथे एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्यावर झालेला अत्याचार हा माणुसकीला काडीमा फासणारा आहे व दोन दिवस जात नाही तर बदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये अमानुष मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. सदर दोन्ही घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. महिलांवर अन्याय अत्याचार व दोन्ही घटनेचा संत साईबाबा बह ऊददशिय संस्थेतर्फे निषेध करण्यात येते व सर्व प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सदर निवेदन देते वेळेस संत साईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे, उपाध्यक्ष गणेश वजे, सचिव पंकज बावणे, सहसचिव सचिन बोंडे, श्रीकांत पतरंगे, लक्ष्मण बोबडे, बबलूजी कुरेशी व तमाम जनता जनार्दन उपस्थित होते.




